Menu Close

Marathi Radio

ॲडलेडवाणी


कला, कल्पना, मनोरंजक माहिती ही जास्तीतजास्त मराठी भाषा प्रेमिकांपर्यंत पोचवण्यासाठी रेडिओ सारखं माध्यम उपलब्ध असताना त्याचा उपयोग करून घ्यावा या उद्देशाने काही स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने ॲडलेडवाणी हा उपक्रम हाती घेतला.

दर बुधवारी रात्री ९:३० वाजता 5 EBI 103.1FM या रेडिओ स्टेशनवरून मराठी कार्यक्रम सादर केला जातो. या केंद्रावरून प्रसारितहोणारे मनोरंजक, माहितीयुक्त कार्यक्रम इतके लोकप्रीय झाले की अल्पावधीतच श्रोते बुधवारी कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहू लागले. कार्यक्रमाला अर्धा तास मिळणारा वेळही त्यांना पुरेसा नाही असे वाटू लागले.

याचे श्रेय अर्थातच कार्यक्रम संजोयकांनाच. दर आठवड्याला सादर करायच्या कार्यक्रमासाठी विषय निवडणे, वक्ता शोधणे, संवादध्वनिक्षेपित करणे, तो वेळाच्या चौकटींत बसवणे असे आणि इतर काही अनेक खटाटोप या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी करावेलागतात. सोपी गोष्ट नाही. ती साध्य करण्यासाठी या मंडळींनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

आतापर्यंत सामाजिक, ऐतिहासिक, सांगितिक, कला- छंद यासारख्या विविध विषयावर मनोरंजक कार्यक्रम बुधवारी ऐकायला मिळालेआहेत.ऐकायला विसरू नका- ॲडलेडवाणी – दर बुधवारी, रात्री ९:३० वाजता 5 EBI 103.1 FM वर.Few community members thought of Radio to circulate Marathi culture to wider audience. They sought a slot on local 5 EBI 103.1 FM radio for half an hour every Wednesday.

The interesting, informative programs were enjoyed and so well appreciated by listeners that they were eager to listen more. Listeners feel need for more time.

Definitely the credit of the success goes to the program organizers.

It is their skill from thinking of a new topic every time, finding suitable , knowledgeable presenter, record the program, audit it and so on. They did special training for it.

So far listeners have enjoyed each program organized on different topics every time.

So tune in to listen Adelaidewani- Wednesday 9:30 pm on 5EBI 103.1 FMClick here to Listen to Adelaidewani

Join Adelaidewanis facebook page for latest program details


Click here to Visit Adelaidewani Facebook Page

Do you want to sponsor Adelaidewani?

Contact adelaidewaniradio@gmail.com for more details